Upcoming IPOs: या आठवड्यात येणारे 17 नवीन आयपीओ, फायद्याची संधी?

Upcoming IPOs: 2025 च्या जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भारतात एकूण 17 नवीन IPO सब्सक्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. यामध्ये मोठ्या कंपन्यांसह लघु आणि मध्यम उद्योगांचाही समावेश आहे. खाली प्रत्येक IPO ची तारीख आणि किंमत जाणून घ्या.

Mainboard IPOs

HDB Financial IPO
HDB Financial IPO 25 जून ते 27 जून 2025 दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. या इश्यूचा प्राइस बँड ₹700 ते ₹740 दरम्यान आहे. ही एक मोठी NBFC कंपनी असून बाजारात मोठ्या लिस्टिंग गेनची अपेक्षा आहे.

Globe Civil Projects IPO
Globe Civil Projects IPO कंपनीचा IPO 24 जूनपासून 26 जूनपर्यंत उपलब्ध असेल. प्राइस बँड ₹67 ते ₹71 प्रति शेअर आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये काम करते.

Ellenbarrie Industrial Gases IPO
Ellenbarrie Industrial Gases IPO साठी सब्सक्रिप्शन 24 ते 26 जून दरम्यान सुरू राहणार आहे. किंमत ₹380 ते ₹400 प्रती शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनी इंडस्ट्रियल गॅसेसच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

Kalpataru IPO
Kalpataru IPO 24 जूनला उघडेल आणि 26 जूनला बंद होईल. किंमत ₹387 ते ₹414 प्रति शेअर निश्चित आहे. ही कंपनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये कार्यरत आहे.

Sambhv Steel Tubes IPO
Sambhv Steel Tubes IPO 25 जूनपासून 27 जूनपर्यंत खुला असेल. प्राइस बँड ₹77 ते ₹82 प्रति शेअर आहे. स्टील ट्यूब उत्पादन करणाऱ्या या कंपनीकडून स्थिर वाढीची अपेक्षा आहे.

Indogulf Cropsciences IPO
Indogulf Cropsciences IPO 26 जूनपासून 30 जूनपर्यंत खुले राहील. याच्या किंमतीबद्दल अजून कोणतीही घोषणा झालेली नाही. कंपनी कृषी रसायन उत्पादनाच्या क्षेत्रात काम करते.

SME IPOs

AJC Jewel IPO
AJC Jewel IPO चं सब्सक्रिप्शन 23 जूनपासून सुरू होऊन 26 जूनपर्यंत असेल. प्राइस बँड ₹90 ते ₹95 ठरवण्यात आला आहे.

Icon Facilitators IPO
Icon Facilitators IPO 24 ते 26 जून दरम्यान खुला असेल. याचा प्राइस बँड ₹85 ते ₹91 आहे.

Abram Food IPO
Abram Food IPO 24 जूनपासून 26 जूनपर्यंत खुले असेल. प्राइस बँड ₹98 निश्चित करण्यात आला आहे.

Shri Hare-Krishna Sponge Iron IPO
Shri Hare-Krishna Sponge Iron IPO 24 ते 26 जूनदरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुले असेल. किंमत ₹56 ते ₹59 दरम्यान आहे.

Suntech Infra Solutions IPO
Suntech Infra Solutions IPO 25 जून ते 27 जूनपर्यंत खुले राहील. याचे प्राइस बँड ₹81 ते ₹86 आहे.

Supertech EV IPO
ही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील कंपनी आपला IPO 25 ते 27 जूनदरम्यान खुले करणार आहे. प्राइस बँड ₹87 ते ₹92 आहे.

Ace Alpha Tech IPO
Ace Alpha Tech चा IPO 26 ते 30 जून दरम्यान ओपन असेल. यासाठी प्राइस बँड ₹101 ते ₹107 निश्चित करण्यात आला आहे.

Moving Media Entertainment IPO
Moving Media Entertainment IPO 26 ते 30 जूनपर्यंत ओपन असेल. याच्या प्राइस बँडबद्दल अद्याप माहिती जाहीर झालेली नाही.

PRO FX Tech IPO
या टेक कंपनीचा IPO 26 ते 30 जूनदरम्यान ओपन असेल. यासाठी प्राइस बँड ₹82 ते ₹87 निश्चित आहे.

Valencia India IPO
Valencia India चा IPO 26 ते 30 जूनपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. प्राइस बँड ₹95 ते ₹110 दरम्यान निश्चित आहे.

Neetu Yoshi IPO
या SME कंपनीचा IPO 27 जूनपासून 1 जुलैपर्यंत ओपन असेल. याच्या किंमतीबद्दल अजून माहिती जाहीर झाली नाही.

हेही वाचा: Kalpataru IPO Review: 24 जूनपासून सुरू, गुंतवणूक करावी का?

Author

  • साजन हे AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड सल्लागार (ARN: 317145) आणि अनुभवी बँकर आहेत. त्यांना शेअर बाजार, IPO आणि म्युच्युअल फंड याबद्दल मराठीत लिहायला आवडतं. MarathiIPO.com या ब्लॉगद्वारे ते लोकांना सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने नियमितपणे IPO अपडेट्स आणि शेअर बाजाराच्या बातम्या शेअर करतात, जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खूप मदतीचं ठरतात.

Leave a Comment