PhonePe IPO: भारताची आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे शेअर बाजारात लवकरच पदार्पण करणार आहे. या IPO मागचं कारण, कंपनीची तयारी आणि भविष्यातील शक्यता काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
PhonePe IPO ची तारीख, उद्देश आणि महत्त्व
PhonePe ऑगस्ट 2025 मध्ये आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स (DRHP) सादर करणार असून, सुमारे 13,014 कोटी रुपये (1.5 अब्ज डॉलर्स) उभारण्याचं लक्ष्य आहे. यामुळे कंपनीची एकूण बाजारमूल्यांकन सुमारे 1.3 लाख कोटी रुपये (15 अब्ज डॉलर्स) होण्याची शक्यता आहे.
PhonePe IPO साठी कशी तयारी केली आहे?
PhonePe ने अलीकडेच आपली कायदेशीर रचना बदलून ‘फोनपे लिमिटेड’ असं नाव घेतलं आहे, जे लिस्टिंगसाठी आवश्यक आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनीने आपलं मुख्यालय सिंगापूरहून भारतात हलवलं आणि पेमेंटवगळता इतर व्यवसाय स्वतंत्र सबसिडियरीजमध्ये विभागले. PhonePe IPO साठी फोनपेने कोटक महिंद्रा, जेपी मॉर्गन, सिटीग्रुप आणि मॉर्गन स्टॅन्ली यांसारख्या मोठ्या बँकांना बुक रनर म्हणून नियुक्त केलं आहे.
हेही वाचा: Globe Civil Projects IPO Review: गुंतवणुकीसाठी योग्य का?
भारतातील डिजिटल पेमेंट्समधील PhonePe चं स्थान
UPI व्यवहारांच्या दृष्टीने PhonePe हे भारतातील सर्वात मोठं नाव आहे. मे 2025 मध्ये, फोनपेने 12.56 लाख कोटी रुपयांचे 8.68 अब्ज व्यवहार पूर्ण केले. यामुळे एकट्या फोनपेचा हिस्सा सुमारे 50% इतका आहे.
देशभरातील 60 कोटी युजर्स आणि दररोज 31 कोटी व्यवहारांची क्षमता यामुळे फोनपेची बाजारातील पकड मजबूत आहे. त्याचबरोबर कंपनीने क्रेडिट, बीमा आणि स्टॉक मार्केट सेवांमध्येही पाऊल ठेवलं आहे.
PhonePe IPO च्या यशाला काय अडथळे आहेत?
कंपनीचं प्रमुख उत्पन्न पेमेंट्समधूनच येत असल्यामुळे, गुंतवणूकदारांना ही एक सिंगल-सोर्स डिपेंडंट कंपनी वाटू शकते. उदाहरणार्थ, पेटीएमसारख्या कंपनीची सध्याची मार्केट व्हॅल्यू सुमारे 6.5 अब्ज डॉलर्स आहे, आणि त्याच्याशी तुलना केली जाते.
UPI व्यवहारांवर सरकारने मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे फिनटेक कंपन्यांना उत्पन्न वाढवण्यात अडचण येऊ शकते.
PhonePe IPO गुंतवणूकदारांसाठी संधी का ठरू शकते?
PhonePe IPO मागे वॉलमार्टसारखी मजबूत कंपनी आहे. यामुळे कंपनीचा बॅकिंग मजबूत आहे. शिवाय, भारतातील डिजिटल व्यवहारांचा वाढता वेग, मोबाईल पेमेंट्सची सवय, आणि टेक्नोलॉजीमध्ये होणारे इनोवेशन पाहता, फोनपेची वाढीची शक्यता मोठी आहे.
जर कंपनीने आपल्या उत्पन्नाचे विविधीकरण केलं, तर तिचा वैल्यूएशन अधिक मजबूत होईल. IPO नंतर PhonePe नव्या क्षेत्रांत गुंतवणूक करू शकेल, जी दीर्घकालीन वाढीस चालना देईल.
हेही वाचा: Ellenbarrie Industrial Gases IPO Review: गुंतवणुकीची संधी की धोका?
FAQs
फोनपेचा IPO कधी येणार आहे?
फोनपे ऑगस्ट 2025 मध्ये सेबीकडे DRHP सादर करणार असून, त्यानंतर IPO ची अचूक तारीख जाहीर होईल.
फोनपे किती रक्कम उभारणार आहे?
फोनपे 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 13,014 कोटी रुपये IPO द्वारे उभारण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे.
फोनपेची सध्याची बाजारमूल्य किती आहे?
या IPO नंतर फोनपेची संभाव्य वैल्यूएशन सुमारे 15 अब्ज डॉलर्स (1.3 लाख कोटी रुपये) असेल.