Ellenbarrie Industrial Gases IPO चा Grey Market Premium (GMP) सध्या ₹40 आहे, ज्यामुळे लिस्टिंगवर सुमारे 10% नफा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. IPO चा प्राइस बँड ₹380 ते ₹400 ठेवण्यात आला होता. GMP धरून, शेअर ₹440 पर्यंत लिस्ट होऊ शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
GMP म्हणजे काय?
Grey Market Premium (GMP) म्हणजे अनौपचारिक बाजारात IPO शेअर्सना मिळणारी अतिरिक्त किंमत. GMP हे गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या वेळी संभाव्य नफा किती मिळू शकेल, याचा अंदाज लावण्यासाठी उपयोगात येते. Ellenbarrie Industrial Gases GMP ₹40 असल्यामुळे, शेअर ₹440 पर्यंत जाऊ शकतो, जो IPO प्राइसपेक्षा साधारण 10% जास्त आहे.
Ellenbarrie Industrial Gases IPO ची तारीख आणि तपशील
Ellenbarrie Industrial Gases IPO 24 जून 2025 रोजी खुला झाला आणि 26 जून 2025 रोजी बंद झाला. अलॉटमेंट 27 जूनला होईल, तर रिफंड्स 30 जूनला दिले जातील. शेअर्स 30 जून रोजी Demat खात्यात जमा होतील. शेअर बाजारात लिस्टिंग 1 जुलै 2025 रोजी होईल. IPO च्या मागणीवरून आणि GMP पाहता, चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
लिस्टिंगवर नफा किती?
सध्या GMP ₹40 असल्यामुळे, सुमारे 10% लिस्टिंग गेनची अपेक्षा केली जात आहे. मात्र, शेवटच्या क्षणी बाजारातील वातावरण, गुंतवणूकदारांचा प्रतिसाद आणि आर्थिक घडामोडींवर हा नफा अवलंबून असतो. त्यामुळे, प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या जोखीम क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घ्यावा.
हेही वाचा: Globe Civil Projects GMP: लिस्टिंगवर 30% नफा? संपूर्ण माहिती