Sambhv Steel Tubes IPO Subscription Status: Sambhv Steel Tubes IPO सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे आणि ग्रे मार्केट प्रीमियमने (GMP) अजूनच उंची गाठली आहे. या लेखात आपण IPO चे ताजे अपडेट्स, सब्स्क्रिप्शनची स्थिती आणि लिस्टिंगबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Sambhv Steel Tubes IPO ला शेवटच्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून ते 30 पट पेक्षा जास्त सब्स्क्राइब झालं आहे. रायपूरस्थित कंपनीने 77-82 रुपये प्राइस बँड ठेवलाय. IPO च्या माध्यमातून कंपनी 540 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. यात 440 कोटी रुपये फ्रेश इश्यू आणि 100 कोटी रुपये OFS (ऑफर फॉर सेल) चा समावेश आहे.
Sambhv Steel Tubes IPO सब्स्क्रिप्शन स्थिती
IPO पहिल्या दोन दिवसांतही चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या दिवशी IPO 1.76 पट सब्स्क्राइब झालं होतं. त्यात NII श्रेणीत 3.12 पट, रिटेलमध्ये 1.84 पट, तर QIB कडून 61 टक्के सब्स्क्रिप्शन झालं. शेवटच्या दिवशी हा आकडा 30 पट पार गेला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता वाढली आहे.
Sambhv Steel Tubes IPO GMP आज
ग्रे मार्केटमध्ये Sambhv Steel चा GMP सध्या 9-10 रुपये दरम्यान आहे. त्यामुळे संभाव्यतः शेअर 11 टक्के प्रीमियमने लिस्ट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी किमान 182 शेअर्ससाठी अर्ज करावा लागतो, ज्यासाठी अंदाजे 14,924 रुपये लागतील.
फंड कसा वापरला जाणार?
IPO मधून आलेला फंड कंपनी मुख्यतः कर्ज फेडण्यासाठी (सुमारे 390 कोटी रुपये) आणि कॉर्पोरेट सामान्य खर्चासाठी वापरणार आहे. यामुळे कंपनीचा आर्थिक ताण कमी होईल आणि वाढीला गती मिळेल.
Sambhv Steel Tubes IPO लिस्टिंग
कंपनीचे शेअर्स 2 जुलै 2025 रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होण्याची शक्यता आहे. GMP आणि सब्स्क्रिप्शनचा जोर पाहता, गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा दिवस ठरू शकतो.
हेही वाचा: NSE IPO News: अनलिस्टेड शेअर्स अजूनही स्थिर, कारण वाचा!