Kalpataru IPO Subscription Status Day 2: Kalpataru Limited चा ₹1,590 कोटींचा मुख्यबोर्ड IPO 24 जून रोजी खुला झाला असून 26 जून रोजी बंद होईल. किंमत बँड ₹387 ते ₹414 आहे. या इश्यूमध्ये केवळ फ्रेश शेअर्स आहेत आणि कोणताही OFS समाविष्ट नाही. कंपनी या निधीतून आपले काही कर्ज फेडण्यासह कॉर्पोरेट खर्चासाठी वापर करणार आहे.
QIB साठी 75%, NII साठी 15% आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10% शेअर्स राखीव आहेत. कर्मचारी विभागात अर्ज करणाऱ्यांना ₹38 ची सूट दिली जाते.
Kalpataru IPO सबस्क्रिप्शन स्टेटस – दुसरा दिवस
Kalpataru IPO ला दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 0.32 वेळा सबस्क्राइब मिळालं. रिटेल सेगमेंट 0.65 वेळा आणि NII सेगमेंट 0.38 वेळा भरला होता. एकूण 71,94,168 शेअर्ससाठी अर्ज आले.
पहिल्या दिवशी IPO फक्त 0.09 वेळा भरला होता. यामध्ये रिटेल विभाग 0.33 वेळा आणि NII विभाग 0.10 वेळा सबस्क्राइब झाला होता. QIB विभाग अजूनही रिकामा आहे, जो अंतिम दिवशी जास्त प्रमाणात भरतो अशी प्रथा आहे.
Kalpataru IPO चा रिव्ह्यू – गुंतवणूक करावी का?
Choice Broking या ब्रोकरेजने Kalpataru IPO ला लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी ‘Subscribe’ रेटिंग दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कंपनी EV/Sales गुणोत्तर 9.3x वर ट्रेड करत असून ते उद्योगातील इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त आहे. Kalpataru चा ब्रँड मजबूत आहे, त्यामुळे त्यांना प्रीमियम किंमत घेण्याची ताकद आहे.
मात्र Gaurav Goel यांचं मत वेगळं आहे. त्यांच्या मते, Kalpataru ची RoE फक्त 0.56% असून ती इतर लिस्टेड कंपन्यांपेक्षा खूपच कमी आहे. कंपनी फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन भागावर अवलंबून आहे, आणि तिचं कर्जही जास्त आहे. त्यामुळे त्यांना हा IPO आकर्षक रिटर्न देईल असं वाटत नाही.
GMP काय सांगतो?
Kalpataru IPO चा GMP सध्या स्थिर आहे आणि ₹20-₹25 च्या दरम्यान ट्रेंड करत आहे. याचा अर्थ लिस्टिंग गेन मर्यादित असण्याची शक्यता आहे.
अर्ज करावा का?
Kalpataru IPO मध्ये लिस्टिंग गेनपेक्षा दीर्घकालीन दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मजबूत ब्रँड आणि स्थिर प्रोजेक्ट पाइपलाइनच्या आधारे लॉन्ग टर्म गुंतवणुकीत स्वारस्य ठेवत असाल, तर तुम्ही अर्ज करू शकता. मात्र कमी RoE आणि जास्त कर्ज लक्षात घेऊन जोखमीची तयारी ठेवावी लागेल.
हेही वाचा: Ellenbarrie Industrial Gases IPO ला दुसऱ्या दिवशी 9% सबस्क्रिप्शन, GMP वाढला